राजापूर | प्रतिनिधी : शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या येथील राजापूर अर्बन को. ऑप. बॅक राजापूरच्या लांजा शाखेचा स्वःमालकीच्या जागेत स्थलांतर सोहळा व ATM कक्षाचा शुभारंभ शनिवार दि. २२. फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता लांजा येथे आयोजित करण्यात आला आहे. बँकेच्या अध्यक्षा सौ. अनामिका सौरभ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे.
राजापूर अर्बन को. ऑप. बॅक राजापूर ची लांजा शाखा दि. २४/१०/१९९९ पासून लांजा येथे ग्राहकांच्या सेवेत कार्यरत आहे. आता बँकेने या ठिकाणी आपली हक्काची जागा घेतली असून बँकेच्या लांजा शाखेचा स्वःमालकीच्या जागेत स्थलांतर सोहळा व ATM कक्षाचा शुभारंभ शनिवार दि. २२. फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता होणार आहे. लांजा बाजारपेठे मध्ये १०१, पहिला मजला मारीगोल्ड बिल्डिंग २ दिपश्री मारीगोल्ड बिल्डिंग जवळ, मुंबई गोवा हायवे, ता. लांजा, जि.रत्नागिरी या ठिकाणी ही शाखा आता कार्यान्वयीत होणार आहे.
याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, लांजा तालुका व्यापारी संघ अध्यक्ष प्रसन्न शेटये, को-ऑप. बँक्स् एम्प्लॉईज युनियन, रत्नागिरी कार्याध्यक्ष सुनिल साळवी, राजापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष व सहकार पॅनेल प्रमुख अनिल तथा रविंद्रनाथ ठाकूरदेसाई आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
या स्थलांतर सोहळा निमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली असून या शाखा स्थलांतर सोहळा व ATM कक्ष शुभारंभ कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे या प्रसंगी आयोजित श्री सत्यनारायणाची महापूजा तीर्थ-प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे उपाध्यक्ष व पालक संचालक विवेक गादिकर, व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष अॅड. शशिकांत सुतार, मुख्यकार्यकारी अधिकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे व कर्मचारी वृंद व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.











