मंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

दापोली l प्रतिनिधी:-        राज्यमंत्री ना. योगेशदा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त दापोली तालुक्यामध्ये विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली असून गेली अनेक महिने बंद असलेली उन्हवरे दापोली मुंबई या बससेवेचा शुभारंभ हा पहिला कार्यक्रम दापोली बस स्थानकामध्ये शिवसेना तालुकाप्रमुख उन्मेष राजे यांच्या हस्ते करण्यात आला.

दापोली मतदारसंघाचे विद्यमान आमदार व राज्याचे गृहमंत्री नामदार योगेशदा कदम यांच्या वाढदिवसा निमित्त दापोली येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दापोली तालुका मराठी पत्रकार परिषद, कोकण एसटी प्रेमी व दापोली पंचायत समितीच्या माजी सभापती ममता शिंदे यांच्या पुढाकाराने गेली अनेक महिने बंद असलेली फरारे मोगरेवाडी-उन्हवरे मुंबई ही बस सेवा दापोली आगराच्या वतीने सुरू करण्यात आली. यावेळी ममता शिंदे यांनी ३२ गावांमध्ये ही बस अत्यंत उपयोगी असून दापोली आगारातील प्रतिष्ठेची अशी ही सेवा गेली अनेक वर्ष ओळखली जाते. मात्र कोरोनानंतर ही बस सेवा अनियमित झाली असून आता राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात येत आहे.

दापोली आगाराने ही सेवा कायम स्वरूपी सुरू ठेवून परिसरातील जनतेला दिलासा द्यावा अशी अपेक्षा यावेळी ममता शिंदे यांनी व्यक्त केली.

यावेळी माजी सभापती किशोर देसाई, कोकण एसटी प्रेमी राज्य उपाध्यक्ष विकास गुरव, सचिव शैलेंद्र केळकर, उन्हवरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मुराद चिकटे, माजी उपसरपंच मंगेश शिंदे, वावघर पोलीस पाटील-गौसिया चिकटे, मिनाज महाते, तनवीर चिकटे, आगार प्रमुख राजेंद्र उबाळे,सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक मुनाफ राजापकर, वाहतूक नियंत्रक हर्षल नाफडे, दापोली आगाराचे चालक वाहक तसेच प्रवासी उपस्थित होते.

________________________________________