राज्यस्तरीय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत दिव्या जड्यार प्रथम

माखजन | वार्ताहर :पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या ,माखजन इंग्लिश स्कूल माखजन ची विद्यार्थिनी दिव्या दयानंद जड्यार ही प्रथम आली आहे.

पुण्याच्या समर्थ भारत अभियान ,श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.दिव्या जडयार ने तालुका,जिल्हा स्तर लीलया ओलांडत राज्यस्तरीय ला आपली मोहोर उमटवत प्रथम क्रमांक पटकावला.तर याच गटातून तालुका जिल्हा स्तरावर यश मिळवून राज्य स्तरावर पोहचलेल्या श्वेता सुरेश कातकर हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.यशस्वी विद्यार्थिनींना सचिन साठे यांनी मार्गदर्शन केले.

 

या स्पर्धेत सुमारे २४ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल खूप अटीतटीचा लागला.अंतिम फेरीत एकूण ५०० स्पर्धकांतून ८३ जणांनी विजेते पदावर आपले नाव लिहिले.त्यात रत्नागिरी संघातील एकूण २८ जणांनी विजेते पद प्राप्त केले आणि रत्नागिरी जिल्ह्याला अभूतपूर्व यश मिळाले.
रत्नागिरीतील विद्यार्थी सहभागी होण्यासाठी डॉ निशिगंधा पोंक्षे व सहकाऱ्यांनी मेहनत घेतली.यशस्वी विद्यार्थिनींचे प्रशालेत अभिनंदन करण्यात आले.यावेळी संस्था सहसचिव दीपक शिगवण,मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर,पर्यवेक्षक अंबादास घाडगे ,सचिन साठे उपस्थित होते.यशस्वी विद्यार्थींनींचे संस्था अध्यक्ष किशोर साठे,उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर आदींसह अन्य संचालकांनी अभिनंदन केले आहे.