आदर्श विद्यामंदिर चिवेली येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना दिला निरोप 

चिपळूण : तालुक्यातील चिवेली पंचक्रोशी विकास मंडळ संचालित आदर्श विद्यामंदिर चिवेली येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थी भावुक झाले होते.

 

आदर्श विद्यामंदिर चिवेली हे एक जुने शैक्षणिक संकुल आहे. ग्रामीण भागात असूनही उत्तम गुणवत्ता प्राप्त हायस्कूल आहे. याच हायस्कूल मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शालेय शिक्षण समितीचे चेअरमन संतोष कुळे यांच्या अध्यक्षते खाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रथम सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षक यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी सर्वजण भावूक झाले. इयत्ता पाचवी ते दहावीचा प्रवास विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. त्या आठवणीने डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

यावेळी चेअरमन संतोष कुळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर हायकुलचे मुख्याध्यापक संजय चव्हाण यांनी सुध्दा शुभेच्छा दिल्या.

सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला एक भेट वस्तू दिली. त्यानंतर सर्व दहावीतील विद्यार्थ्यांना शालेय समितीचे चेअरमन यांनीही छोटीशी भेट वस्तू दिली.

या कार्यक्रमाला ग्राम समिती सदस्य तुकाराम वणे, सर्व शिक्षक, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सानिका शिबे आणि मानशी कदम यांनी केले.