रत्नागिरी | प्रतिनिधी : श्री क्षेत्र नाणीजधाम येथील संत शिरोमणी गजानन महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्याला उपस्थितीत राहिलो ते एक हिंदू म्हणूनच. हीच माझी सर्वात पहिली ओळख आहे. पदे येतात आणि जातात पण या संतपीठावरून जगतगुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांच्याकडून मिळणारी उर्जा आयुष्यात नेहमीच प्रेरणादायी ठरली आहे असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. तर आपल्या जमिनीचे संरक्षण करण्यासाठी सनातन बोर्ड स्थापन करण्यासाठी जगतगुरूनी पुढाकार घ्यावा असे आवाहन सुद्धा त्यांनी केले.
श्री क्षेत्र नाणीज धाम येथील नागरी सत्कारादरम्यान ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जगतगुरू नरेंद्रचार्याजी महाराज यांच्यासह मठाचे उत्तराधिकारी कानिफनाथ महाराज, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री योगेश कदम, आ. भास्कर जाधव, आ. शेखर निकम, आ. किरण सामंत, ज्येष्ठ पत्रकार उल्हास घोसाळकर आधी संतपीठावर उपस्थित होते. यावेळी ना. राणे म्हणाले महाराज आणि राणे कुटुंबियांचे खूप जुने संबंध आहेत. त्यांचे नेहमीच आम्हाला आशीर्वाद मिळत असतात. महाराज जे काम करतात ते प्रेरणादायी असून आमच्यासारखा लोकप्रतिनिधींना ऊर्जा देणारे आहे. म्हणूनच त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे हिंदू म्हणून आलो आहे. इथे मी आमदार मंत्री नाही तर जन्म आणि मृत्यूच्या या प्रवासात ज्याने मला ओळख दिली त्या हिंदू धर्मच शेवटपर्यंत माझ्यासोबत राहणार आहे. आणि याचा मला अभिमान आहे. पण आज मोठ्या वेगाने देशाचे इस्लामीकरण व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशावेळी ओल्या इस्लामीकरणाला रोखण्याची मोठी ताकद जगद्गुरूंमध्ये आहे. आज लव्ह जिहाद लँड जिहाद लाच्या माध्यमातून आपली युवा पिढी आणि आपली जाणून आपल्यापासून दूर नेली जात आहे. इस्लामीकरण केले जात आहे. अशावेळी धर्मांतर विरोधी कायदा करण आवश्यक असून आमचे हिंदुत्ववादी सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा कायदा लवकरच आणेल असा विश्वास ना. राणे यांनी व्यक्त केला. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे खात्याच्या माध्यमातून जसे राज्यातील ७२० किलोमीटरच्या किनारपट्टीवर मत्स्य उत्पादन वाढविणे, रोजगार निर्माण करणे यासाठी मी काम करणार आहे त्याचवेळी किनारपट्टी जिहादी मुक्त अतिक्रमण मुक्त करण्यासाठी कडक पावले निश्चितपणे उचलणार आहे असे ना. नितेश राणे यांनी सांगितले.
यावेळी जगतगुरूंचे आशीर्वाद महत्वाचे असून त्यांनी वक्फ बोर्डाच्या माध्यमातून जे हिरवे संकट घोंघावते आहे ते दूर करण्यासाठी सनातन बर्ड तयार करून आपल्या जमिनी संरक्षित करण्यासाठी जगतगुरूनी पुढाकार घ्यावा असे आवाहन सुद्धा ना. नितेश राणे यांनी केले. यावेळी या नागरी सरकारवर सर्वच लोकप्रतिनिधींचे नागरी सत्कार करण्यात आले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की आज जगतगुरु नरेन्द्रचर्यांमुळे नाणीज गाव जगभरात पोहोचले आहे. महाराजांनी अध्यात्मासोबतच रोजगार आणि उद्योजक सुद्धा निर्माण केले आहेत. जसं महाराजांनी हिंदू धर्माचा प्रसार केला तीच जबाबदारी कानिफनाथ महाराजांनी खांद्यावर घेतली आहे. या कार्यासाठी संपूर्ण शासन आपल्या सोबत आहे अशी ग्वाही ना. सामंत यांनी दिली. आपल्याला या सत्कार आणि आशीर्वादांमुळे ऊर्जा मिळाली असल्याचे ना. योगेश कदम म्हणाले. यावेळी जगतगुरू नरेंद्राचार्य महाराजांनी उपस्थित लोकप्रतिनिधींच्या कामांचा आवर्जून उल्लेख केला. ही लोकोपयोगी कामे केल्यामुळेच कोकण विकासात भर पडणार असल्याचे आणि आपले आशीर्वाद असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ. जाधव,आ. निकम आणि जेष्ठ पत्रकार उल्हास घोसाळकर यांनीही मनोगते व्यक्त केली.