छत्रपती शिवाजी महाराज स्वतःसाठी नव्हे तर या मातीसाठी जगले : पूर्णिमा केरकर

अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज पेडणेतर्फे महिलांचा सन्मान

पेडणे (प्रतिनिधी) : जिजाऊ मातांनी संस्कार आणि संस्कारमय जीवनातून छत्रपती शिवाजी महाराजाना घडवले. आपला पुत्र देश सुरक्षित ठेवण्यासाठी लढला पाहिजे असा विचार केला. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतःसाठी जगले नाहीत तर या भूमीच्या संरक्षणासाठी जगले, असे प्रतिपादन साहित्यिका पूर्णिमा केरकर यांनी केले.

अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज पेडणे तर्फे सावंतवाडा मांन्द्रे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कर्तृत्ववान स्त्रीचा गौरव सोहळा आयोजित केला होता. यावेळी डॉ. भाग्यश्री शेट्ये, अखिल गोमंतक छत्रिय मराठा समाज पेडणे समितीचे अध्यक्ष श्याम शेट्ये, सचिव ॲड. अमित सावंत, शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष सखाराम सावंत, खजिनदार तुलसीदास गावस, मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर, श्री पालयेकर आदी उपस्थित होते. सुरुवातीला सोनाली सावळ देसाई परब यांनी स्वागत सूत्रसंचालन केले.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सर्व मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी पेडणे तालुक्यातील एकूण ४१ कर्तुत्ववान महिलांचा राज्य व राष्ट्रीय पातळीवर केलेल्या कार्याची दखल घेत समितीने जाहीर सत्कार केला. यामध्ये मुग्धा ज्ञानेश्वर, सिध्दी परब, विजया उल्हास शेट्ये, जानकी तुकाराम परब, सुनिती विनायक सावंत महाले, लता गोविंद, दया निळकंठ शेट्ये, अनिता अनंत पार्सेकर, अक्षता अजित परब, रौशनी रंगनाथ गांवकर, गायत्री शशीकांत गावस, अस्मिता अशोक शेटये, प्रभावती वासुदेव नारुलकर, हेमलता पांडुरंग राऊळ, तारामती रामा राव, सुधा अशोक परब, नमिता विष्णू राऊळ, जागृती रामा परब, द्वारकी गोपाळ नाईक, सुयेशा सुभाष सावंत, लिलावती गंगाराम सावंत, यशोदा सगुण मोरजकर, लक्ष्मी धनंजय शेटगावकर, सिध्दी यशवंत शेट्ये, गुलाबी देऊ सावंत, द्रोपदी महादेव सावंत, चंद्रावती दत्ताराम शेट्ये, गायत्री गोविंद परब, पंढरी यशवंत सावंत, ज्योती हनुमंत शेटगावकर, हिरा दत्ताराम परब, उर्मिला भरत पार्सेकर, सरिता सोनू शेटगावकर, रतन भिकाजी परब, मिनिका जर्नादन शेटगावकर, विभा विठोबा परब, सुषमा वसंता, कांत रवळनाथ शेट्ये, दिलक्षा सुमीत सावंत, ॲड. गौतमी तुकाराम शेट्ये व साची तुलस्कर यांचा गौरव करण्यात आला.

ॲड. अमित सावंत यांनी अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज पेडणे समितीने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. हनुमंत शेटगावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित पोवाडा सादर केला. महिलांनी स्वागत गीत सादर केले. प्रमुख पाहुणे डॉक्टर भाग्यश्री चंद्रकांत शेट्टी, श्याम शेट्ये यांनी मनोगत व्यक्त केले.