रेकॉर्ड डान्स स्पर्धेत समर्थ गवंडी तर वक्तृत्व स्पर्धेत दक्ष शेर्लेकर प्रथम

मडूरा येथे शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न

बांदा l प्रतिनिधी :मडूरा येथील छत्रपती शिवाजी महाराज व्हाट्सअप ग्रुप तर्फे आयोजित खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत रेडी येथील समर्थ गवंडी याने प्रथम क्रमांक पटकावला. वकृत्व स्पर्धेत दक्ष विजय शेर्लेकर याने प्रथम क्रमांक मिळविला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेची पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

मडूरा येथे छत्रपती शिवाजी महाराज व्हाट्सअप ग्रुप तर्फे शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त सकाळी शिव पूजन व दीप पूजन तसेच संपूर्ण गावात रॅली काढण्यात आली. सायंकाळच्या सत्रात खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा व वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. रेकॉर्ड डान्स स्पर्धेत प्रथम समर्थ गवंडी (रेडी), द्वितीय समृद्धी घनश्याम परब, तृतीय त्रिशा पेडणेकर, उत्तेजनार्थ लावण्या मेस्त्री. वकृत्व स्पर्धेत प्रथम दक्ष शेर्लेकर, द्वितीय वैभवी सावळ, तृतीय चैताली परब.

 

सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी एमएसईबी चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रवीण परब, उपसरपंच बाळू गावडे, ग्राम कमिटी अध्यक्ष दिलीप परब, कोकण रेल्वे स्टेशन मास्तर कृष्णकांत परब, मडुरा सोसायटी संचालक लाडू परब, केशव परब, भूषण परब, आयोजक प्रवीण परब, दाजी सातार्डेकर, परीक्षक रोहन तांबोसकर, अविनाश म्हापणकर आदी उपस्थित होते.

 

यावेळी स्पर्धकांनी एकाहून एक सरस रेकॉर्ड डान्स सादर केले. यावेळी कृष्णकांत परब, दिलीप परब यांनी मार्गदर्शन केले. शिवरायांच्या नामाचा जयघोष करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील नितीन नाईक यांनी केले.

———–