रत्नागिरीत शत प्रतिशत भाजप पक्ष करण्याचा निर्धार करूया

संपर्क मंत्री ना. नितेश राणे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्वमधे भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा संघटनात्मक बैठक आज मुंबईत आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा रत्नागिरीचे संपर्क मंत्री नितेश राणे, भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत ही बैठक पार पडली. यावेळी जिल्हा संपर्क मंत्री ना. राणे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. पक्ष तुमच्या पाठीशी सक्षमपणे उभा आहे. आवश्यक ती सर्व ताकद पुरवली जाईल. रत्नागिरी जिल्ह्यात शत प्रतिशत भाजप पक्ष प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने सर्वांनी निर्धार करूया, असा विश्वास उपस्थित त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिला.

यावेळी माजी आमदार विनय नातू, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार सूर्यकांत दळवी, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ. शिल्पाताई मराठे, भाजपा दक्षिण रत्नागिरी महिला मोर्चा अध्यक्षा वर्षाताई ढेकणे, सचिन वहाळकर, दिपक पटवर्धन आदी पदाधिकारी उपस्थित होते.