ना. नितेश राणे यांनी केली श्री देव कुणकेश्वरची प्रथम पूजा, महाशिवरात्रीच्या निमित्ताने देव कुणकेश्वर यात्रा मोठ्या गर्दीत सुरू

महाशिवरात्रीच्या निमित्ताने देव कुणकेश्वर यात्रा मोठ्या गर्दीत सुरू

सिंधुदुर्ग – महाशिवरात्रीच्या निमित्ताने देव कुणकेश्वर यात्रा प्रचंड गर्दीत सुरू झाली आहे. मंगळवारी (२५ फेब्रुवारी) मध्यरात्री १ वाजता सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते श्री देव कुणकेश्वराची प्रथम पूजा पार पडली.

यावेळी नामदार नितेश राणे यांनी श्री देव कुणकेश्वर चरणी मनोभावे प्रार्थना करत, “जनतेला सुखी ठेव आणि त्यांचे सर्व दुःख हरण कर,” अशी विनंती केली.

यंदाची यात्रा केवळ एक दिवसाची असल्याने भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. भक्तिमय वातावरणात यात्रा उत्साहात सुरू आहे.