अमित खोत | मालवण : जागतिक महिला दिनानिमित्त मालवण भाजप महिला आघाडीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. दांडी व धुरीवाडा येथील प्राथमिक शाळेतील काव्या कुबल व हर्षदा सावबा यां दोन मुलींना सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत दत्तक घेण्यात आले.
दरम्यान, मालवण पोलीस ठाणे येथील महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत यांच्यासह अन्य महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी भाजपच्या महिला शहराध्यक्ष अन्वेषा आचरेकर, वैष्णवी मोंडकर, महिमा मयेकर, राणी पराडकर, दिव्या कोचरेकर, अमिता निवेकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, पूजा करलकर, तारका चव्हाण, दीक्षा गावकर, अपर्णा सावंत, सुप्रिया पेंडुरकर, पूजा वेरलकर, नंदिता हडकर, स्वाती शारबिंद्रे आदी उपस्थित होते.











