वेर्ले सटवाडी रस्ता डांबरीकरणाचे रवींद्र मडगावकर यांच्या हस्ते भूमिपूजन

सावंतवाडी । प्रतिनिधी : वेर्ले सटवाडी रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन भाजपचे आंबोली मंडल अध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी तालुका उपाध्यक्ष सुभाष राऊळ, सरपंच रुचिता राऊळ, ग्रामपंचायत सदस्या स्नेहा राऊळ, भगवान राणे, माजी सरपंच बाबा राऊळ विलास राऊळ, यशवंत राऊळ, गंगाराम राऊळ, गोविंद राऊळ ,तुकाराम बिडये, चंद्रकांत राऊळ , अनंत राऊळ न्हानू राणे रामा राणे,गोपाळ राणे ,महादेव राणे,नारायण ठाकूर ,शांताराम सावंत, भिवा कदम यांसह वाडीतील सर्व ग्रामस्थ तसेच महिला भगिनी उपस्थित होत्या.