The public will raise the market of the saffron who are moving the market in a fraudulent way: Sanju Parab
बाल हट्टापायी सावंतवाडीकर जनतेला धरले वेठीस
झिरंगवाडी रस्ता न केल्यास घालणार फोटोला हार
सावंतवाडी । प्रतिनिधी : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या हेकेखोर स्वभावापायी तलावाकाठचा आठवडा बाजार हलवला आहे. केवळ आपला हट्ट पुरवण्यासाठी सावंतवाडीच्या नागरीकांना त्यांनी वेठीस धरले आहे. त्यामुळे एकदिवस जनताच यांचा बाजार उठवेल अशी टीका करतानाच मुख्याधिकाऱ्यांनी बाजार हलवण्यास विलंब केल्यामुळे त्यांची बदली करण्यात आली. तर हॉकर्स संघटनाही त्यांच्या दबावाला बळी पडली. त्यामुळे या दहशतीविरोधात आपण जिल्हाधिकार्यांची भेट घेणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली.
दरम्यान, झिरंगवाडी येथील रस्ता झाला नाही तर दीपक केसरकर यांचा त्याठिकाणी फोटो उभारून फोटोला हार घालणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस बंटी पुरोहित, युवा मोर्चा शहर अध्यक्ष संदेश टेमकर आदी उपस्थित होते.
निसर्गरांच्या दबावाखातर सावंतवाडी नगरपालिकेने आठवडा बाजार गोदामाच्या ठिकाणी हलवला. हा बाजार गटारात भरवला जात आहे. या ठिकाणी पार्कींग, टॉयलेटची व्यवस्था नाही. तर पावसाळ्यात गोडाऊनच्या मागच्या भागात चिखलाचे साम्राज्य पसरणार आहे. तर मिलाग्रीस शाळेच्या मुलांना मोठा अडसर होणार आहे. त्यामुळे जनतेला हाल भोगावे लागणार असल्याचेही सांगितले.
ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरवला जात आहे तिथे जुन्या न्यायालयाच्या आवारातील अनेक जुने वृक्ष वठलेले आहेत. त्यामूळे वाळलेली फांदी पडून अपघात होऊ शकतो. त्यांनी हानी पोहोचल्यास किंवा झाड कोसळून कुणी मुत्यूमुखी ठरल्यास त्याचीही जबाबदारी केसरकर यांची राहणार आहे. हे टाळायचं असल्यास त्यांनी आपला हट्ट सोडून बाजार जसा होता तसा तलावाकाठी पूर्ववत करावा. नाहीतरी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर हा बाजार आम्ही पुर्ववत करू असेही संजू परब यांनी स्पष्ट केले.
मुख्याधिकारी जयंत जावडेकर हे दीपक केसरकर यांच्या दहशतीखाली होते. केसरकर यांच्या सूचनेनंतरही अनेक आठवडे बाजार तलावा काठावर न हलवल्यामुळे त्यांची बदली करण्यात आली. हा आठवडा बाजार तलावाकाठी अलविताना आम्ही नगरपालिकेत तसा ठराव करून घेतला होता. आता ठराव न करताच हा बाजार हलविण्यात आला आहे. त्यामुळे यासंदर्भात जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.तीन टर्म आमदार राज्यमंत्री व आता कॅबिनेट मंत्री असणारे केसरकर आतापर्यंत ५ लोकांनाही रोजगार देवू शकले नाहीत. आता ते म्हणे जर्मनीला रोजगार देणार आहेत. चष्म्याचा कारखाना, सेट टॉप बॉक्स याचं काय झालं. मतदार संघातील टाटा मेटॅलिक व उत्तम स्टीलचा प्रकल्पही ते सुरु करु शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी आता बाता मारणे बंद करावे. जनता आता भूलणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हॉकर्स संघटनेवर दबाव की मॅनेज : संजू परब
आठवडा बाजार तलवाकाठीच राहावा ही नागरिकांबरोबरच हॉकर्स संघटनेचीही मागणी होती. त्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला होता.
मात्र, या जागेला त्यांनी कसा काय होकार दिला याचे आश्चर्य वाटते. हॉकर्स संघटनाही केसरकर यांच्या दबावाला बळी पडली की मॅनेज झाली असा सवाल संजू परब यांनी उपस्थित केला.












