खेड ( प्रतिनिधी) खेड तालुक्यातील साईधाम बिजघर येथील प्रसिद्ध साई मंदिराचा वर्धापनदिन सोहळा मोठ्या भक्ती भावाने उत्साहात शेकडो भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला या वेळी मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय मुख्यालय उद्घाटन सोहळा खेडच्या प्रांताधिकारी सौ. राजश्री मोरे यांच्या हस्ते संपन्न झाला तर प्रमुख पाहुणे म्हणून दापोली मतदार संघाचे मा. आमदार संजयराव कदम राष्ट्रीय सरचिटणीस सुरत येथील उद्योजक विजयराव कदम बडोद्याचे राष्ट्रीय संस्थापक सदस्य व ज्येष्ठ उपाध्यक्ष प्रदीप मोरे राष्ट्रीय महीला अध्यक्षा प्रा सौ. संध्याताई राणे राष्ट्रीय उपाध्यक्ष ऍड आनंदराव भोसले ज्येष्ठ समाज नेते ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव नगर जिल्हा अध्यक्ष वसंतदादा मल्टीस्टेट बँकेचे संचालक दिपकराव धट पाटील सौ. श्रध्दा धट पाटील पुणे जिल्हा महीला अध्यक्षा सौ. वैशाली गलगटे राज्य उपाध्यक्ष अनिल बुवा जाधव राज्य सरचिटणीस संजयराव जाधव आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील मान्यवर शेकडो भाविक उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंदिराचे प्रवर्तक तसेच मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी भूषविले.
या वेळी बोलताना भोसले यांनी सांगितले गेली दोन दिवस मंदिरात कार्यक्रमांची रेलचेल होती सवेणी ग्रामस्थ यांचे जागरण कार्यक्रमानिमित्त शुक्रवार दिनांक १९ रोजी रात्रभर सुश्राव्य भजन संपन्न झाले दिनांक २० रोजी नित्यनियमा प्रमाणे पुजा अर्चा काकड आरती सकाळी ११.०० वाजता सत्यनारायण महापूजा १२.३० वाजता कार्यालय उद्घाटन सोहळा तसेच १.०० वाजता साई भंडारा पार पडला कार्यक्रम यशस्वीतेसाठी निवृत पोलीस निरीक्षक रमेशराव भोसले ज्येष्ठ समाज नेते नारायणराव भोसले कॅप्टन राजारामराव भोसले वसंतराव भोसले, शिवाजीराव भोसले थोरले मानकरी सुनीलराव भोसले सीताराम सालप सुनील बैकर तुकाराम पारटे मराठा क्रांती स्वराज्य संघटना रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष विजयराव येरुणकर, जिल्हा सरचिटणीस अंकूशराव चाळके, जिल्हा सचिव रामचंद्र गायकवाड, शुभम गायकवाड, खेड तालुका अध्यक्ष विवेक कदम खेड शहर अध्यक्ष रोहनशेठ विचारे सौ सुनीता देठे सौ कविता पाटील सौ धनश्री पाटील सौ पुनम पोळ रहाता तालुका अध्यक्ष उत्तम धट पाटील अमोल नाईकवाडे सोमनाथ राशिंकर आदी मान्यवरांसह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व बिजघर ग्रामस्थांनी फारच मेहनत घेतली