
युवा उद्योजक प्रितम विलास गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेच्या वतीने चौके येथे जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धा संपन्न
मालवण | प्रतिनिधी : युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रितम विलास गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण तालुका यांच्या वतीने चौके येथे आयोजित एक गांव एक संघ जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत सिद्धिविनायक राईवाडी विजेता ठरला. सिद्धेश्वर दाळकर तळवडे उपविजेता, म्हाळई देवी तळवडे तृतीय, वक्रतुंड तुळसुली चतुर्थ या संघांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेत १० संघ सहभागी झाले होते. यात सिद्धिविनायक राईवाडी, रवळनाथ काळसे
बजरंगबली हिर्लोक, वक्रतुंड तुळसुली, श्री सिद्धेश्वर म्हाळई देवी तळवडे, रामेश्वर कोचरा, सिद्धेश्वर दाळकर, मारुती पर्सन, गणेश हुंडा वॉरियर्स, स्वामी स्पोर्टर्स राईवाडी आई भराडी ग्रुप आदी सहभागी होते. यात सिद्धिविनायक राईवाडी (प्रथम),
सिद्धेश्वर दाळकर तळवडे (द्वितीय), म्हाळई देवी तळवडे (तृतीय), वक्रतुंड तुळसुली (चतुर्थ) क्रमांकाचे मानकरी ठरले.
विजेत्यांना प्रथम पारितोषिक – ७००७ रुपये आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक ५००५ रुपये आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक ३००३ रुपये आकर्षक चषक, चतुर्थ पारितोषिक २००२ रुपये आकर्षक चषक व अन्य पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रितम गावडे यांच्यासह मनसे माजी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, मनविसे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य व मनविसे रत्नागिरी सिंधुदुर्ग संपर्क अध्यक्ष अमोल साळुंखे, उपविभाग अध्यक्ष विलेपार्ले विधानसभा अभिजित मेथर, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर,
मनविसे माजी जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, मनविसे मालवण तालुका अध्यक्ष संदीप लाड, माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर, विल्सन गिरकर, रामनाथ पराडकर, कुणाल चोडणेकर, गणेश सातार्डेकर, गणेश गावडे, लौकिक मेथर, राहुल मोंडकर यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रितम यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
युवा उद्योजक प्रितम गावडे यांचा वाढदिवस त्याच्या मित्रपरिवार व मनसेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्ताने प्रितम यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मित्रपरिवार, व्यावसायिक, उद्योजक अश्या सर्व स्तरातून तसेच विविध राजकीय पक्ष पदाधिकारी यांच्या माध्यमातूनही प्रितम यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसही सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.
फोटो : युवा उद्योजक प्रितम विलास गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेच्या वतीने चौके येथे आयोजित जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेतील विजेत्या संघास सन्मानित करताना मान्यवर. (अमित खोत, मालवण)












