गोळवण चव्हाणवाडी येथे स्मशान शेड बांधकामाचा शुभारंभ!

 

मसुरे | झुंजार पेडणेकर : गोळवण चव्हाणवाडी येथील स्मशानभूमी शेड बांधणे कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत सदस्या श्रीमती प्राजक्ता चिरमुले यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. सदर कामासाठी जिल्हा वार्षिक योजने मधून ५ लाख रुपये मंजूर असून त्यासाठी भारतीय जनता पक्षाचे मालवण तालुका अध्यक्ष श्री. धोंडी चिंदरकर, जिल्हा बँकेचे संचालक श्री. बाबा परब, सचिव श्री.महेश मांजरेकर, जिल्हा उपाध्यक्ष ,श्री.अशोक सावंत,गोळवन सरपंच श्री. सुभाष लाड यांनी प्रयत्न केले.या कामी माजी खासदार श्री. निलेश राणे, पालक मंत्री, श्री. रवींद्र चव्हाण यांचे खास सहकार्य लाभले आहे. या वेळी गावचे सरपंच श्री. सुभाष लाड, उप सरपंच श्री. गावडे सर, ग्रामपंचायत सदस्या श्रीम. प्राजक्ता चिरमुले, श्री. भाई चिरमुले, श्री. संतोष चव्हाण, भगवान चव्हाण, बाळा चव्हाण, भाई नाईक, बाबा परब व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी श्री. सुभाष लाड यांनी निधी उपलब्धते साठी भाजप पदाधिकारी यांचे आभार मानले.