राजापूर (प्रतिनिधी): राजापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत गणेश जामसांडेकर (७०) यांचे शनिवारी १५ मार्च रोजी अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे निधन झाले.
मुळचे देवगड तालुक्यातील जामसांडे येथील रहिवाशी असलेले जामसांडेकर हे व्यवसायानिमित्त राजापुरात आले व स्थायिक झाले होते. जामसांडेकर ज्वेलर्स हा त्यांचा सुवर्णपेढीचा राजापुरात व्यवसाय होता. त्यामुळे शहर व तालुका परिसरात ते सगळयांना परिचित होते.
राजापूरच्या राजकिय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रिडा क्षेत्रात त्यांचा कायमच सक्रिय सहभाग होता. राजापूर अर्बन बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले होते. याच काळात त्यांनी बँकेच्या अध्यक्षपदाचीही धुरा सांभाळली होती.
गेले काही वर्षे ते कोल्हापूर येथे मुलाकडे वास्तव्यास होते. काही वर्षापुर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यातच शनिवारी त्यांची प्राणज्योत मालावली.
त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, विवाहित मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर कोल्हापूरात अंत्यसंस्कार करण्यात आले.












