जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून ८९ वे मरणोत्तर देहदान

संगमनेर : जवळे कडलग येथील श्रीमती ठकुबाई शिवराम कदम ( वय ८२ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून ठकुबाई यांचे मरणोत्तर देहदान करण्यात आले. संस्थांतर्फे झालेले हे ८९ वे मरणोत्तर देहदान आहे.

१९ मार्च २०२५ रोजी त्यांचे पार्थिव “प्रवरा मेडिकल ट्रस्ट, लोणी”( ता. राहाता.) यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुलगे व चार मुली नातवंडे असा परिवार आहे.

मुलगा – संजय शिवराम कदम, सून – उषा संजय कदम मुलगा – दत्तात्रय शिवराम कदम सून – छाया दत्तात्रय कदम मुलगी – मीना नंदराम शिरसाट, जावई – नंदराम केशव शिरसाट, मुलगी – जनाबाई बबन ससाने, जावई – बबन खंडू ससाने, मुलगी – बेबी अंबादास गाडेकर, जावई – अंबादास द्वारकानाथ गाडेकर मुलगी – शोभा दादासाहेब गाडेकर, जावई – दादासाहेब भाऊसाहेब गाडेकर, नातवंडे आहेत.यावेळी स्व – स्वरूप संप्रदायातर्फे उत्तर आहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्यासह संगमनेर, श्रीरामपूर, राहता तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी मृत्यूनंतरही लोकांच्या उपयोगी पडण्याचे आवाहन केले होते. त्यातून मरणोत्तर देहदानाची कल्पना पुढे आली. त्याला भक्तांनी मोठा प्रतिसाद दिला. हे सर्व देह जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात येतात. तेथील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शरीररचनाशात्र शिकण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आत्तापर्यंत ८९ जणांनी असे देहदान केले आहे. उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील हे पाचवे मरणोत्तर देहदान आहे..