ओटवणे (प्रतिनिधी ) जानेवारी मध्ये कळसुलकर हायस्कूल येथे पार पडलेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षेत ( BTS ) परीक्षेत माडखोल शाळा नं . २ , धवडकी शाळेच्या विदयार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले असून धैर्य कोळमेकर, रुद्र पाटील, आणि संस्कृती घोरपडे या विदयार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत आपला ठसा उमटवीला. इयत्ता -३ री मधील धैर्य दत्ताराम कोळमेकर याने
१२८ गुणांसह सावंतवाडी तालुक्यात प्रथम येण्याचा मान तर राज्यात ५४ वा क्रमांक मिळवीला.
रुद्र विश्वास पाटील याने
११८ गुणांसह सावंतवाडी तालुक्यात तृतीय तर राज्यात १०१ वा क्रमांक पटकवीला .
तर संस्कृती तात्यासो चोपडे हिने ११४ गुणांसह सावंतवाडी तालुक्यात चौथी आली तर राज्यात ११७ वा नंबर पटकवीला तर
इयत्ता – ७ वी मधील रामभाऊ सोमा गावकर हा
७८ गुण मिळवित सावंतवाडी तालुक्यात सहावा तर राज्यात 189 वा आला ,लिखित प्रमोद बंड याने ५२ गुण मिळवीत सावंतवाडी तालुक्यात सातवा तर राज्यात ३५१ नंबर पटकवीला. या सर्व गुणवंत विध्यार्थाना अरविंद सरनोबत,वैशाली पाटील या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.शैक्षणिक
गुणवत्ता असो किंवा कौशल्य,क्रीडा उपक्रम किव्हा इतरही शालेय उपक्रम नेहमीच माडखोल धवडकी शाळा अग्रेसर असते. तालुका असो किव्हा जिल्हा राज्य या शाळेतील मुले विविध क्षेत्रात ठसा उमटवितात त्यामुळे या विध्यार्थ्यांच्या गुणवत्ते ला वाव देत त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक वृंदाचे तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन कमिटी कडून अभिनंदन करण्यात आले.












