दापोली l प्रतिनिधी : आगरवायंगणी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित बहुजन हिताय विद्यामंदिर आगरवायंगणी येथे दापोली-मंडणगड-खेड मतदार संघाचे लोकप्रिय आमदार व नामदार योगेश दादा कदम (राज्यमंत्री) यांच्या सौभाग्यवती श्रेयाताई योगेश कदम यांनी भेट दिली.
बहुजन हिताय विद्यामंदिर आगरवायंगणी प्रशाळेतील विद्यार्थ्यांनी ढोल ताशा व लेझीमच्या पथकात श्रेया ताईंचे स्वागत केले. त्याचबरोबर शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका जयश्री रिंगणे यांनी विद्यार्थ्यांकडून बसविलेल्या स्वागत पद्याने स्वागत करण्यात आले. प्रशाळेचे माजी मुख्याध्यापक आकाराम महिंद यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांच्या समवेत आलेल्या दिप्ती निखार्गे, ममता शिंदे, डाॅ. शबनम मुकादम पोलीस पाटील विजय महाडिक, संस्थेचे सचिव संतोष आंबेकर, माजी मुख्याध्यापक आकाराम महिंद, नवनिर्वाचित मुख्याध्यापक सत्यवान दळवी, जयश्री रिंगणे, अनिश काळे, शैलेश वैद्य, शिक्षकेतर कर्मचारी प्रकाश महाडिक, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गावचे प्रथम नागरिक व संस्थेचे सचिव संतोष आंबेकर यांनी केले. त्याचबरोबर श्रेयाताईंनी मुलांबरोबर संवाद साधला. त्यांना बेंचवर बसण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी बेंचवर बसून विद्यार्थ्यांसमवेत फोटो काढले.
प्रशाळेचे मुख्याध्यापक सत्यवान दळवी यांनी शाळेच्या गरजा ओळखून व विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या गरजांची पूर्तता करण्याची निवेदन दिले.










