मंडणगड l प्रतिनिधी :येथील वाकवली गावचे सुपुत्र श्री.सिद्धार्थ जाधव यांनी मंडणगड येथे, श्री. दिनेश सापटे यांच्या घरी नृत्य नटराज अकॅडमी ची सुरुवात केली आहे. तिचे उद्घाटन गुरुवार दिनांक 27 मार्च 2025 रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या विचार मंचावर मंडणगड नगर परिषदेचे नगरसेवक श्री. आदेश मर्चंडे , श्री .मनोज पालांडे, श्री. दिनेश सापटे, धम्मचारी सत्यसिद्धी, साहित्यिक श्री.किशोर कासारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यानंतर श्री. सिद्धार्थ जाधव यांनी नृत्याचे प्रतीक म्हणून नटराज प्रतिमेचे पूजन केले. यानंतर धम्मचारी सत्यसिद्धी यांनी या अकॅडमी संदर्भात भूमिका मांडली. मंडणगड हळूहळू विकसित होतो आहे. आणि अशा प्रकारे नवीन संकल्पनाची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर आदेश मर्चंडे, दिनेश सापटे, साहित्यिक किशोर कासारे व भा.ला.
टूले यांनी ही शुभेच्छा दिल्या.
मंडणगड तालुक्यातील नृत्य शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थिनी व विद्यार्थी यांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना श्री. शांताराम पवार यांनी केले.
विद्यार्थ्यांसाठी एक नवे दालन खुले झाल्याचे ते म्हणाले.
शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.











