आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून पाथर्डे शाळेला प्रोजेक्टर भेट

राजापूर (वार्ताहर): कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार अड. निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून तालुक्यातील जि. प. पाथर्डे शाळेला प्रोजेक्टर भेट मिळाला आहे. त्याचे उद्घाटन भाजपाच्या महिला प्रदेश मोर्चा सचिव सौ. शिल्पा मराठे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत गुरव, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. सुयोगा जठार, मोहन घुमे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय मांडवकर, उपाध्यक्षा समृध्दी मांडवकर, ग्रामस्थ मंडळ मुंबईचे अध्यक्ष गणपत धांगट, वसंत बावकर, पोलिस पाटील सौ. सिध्दी सिनकर, शिक्षक श्री. आरेकर, सौ. कविस्कर, सौ. काडगे व मुख्याध्यापक श्री. गिरकर उपस्थीत होते.
या देणगीबद्दल आमदार श्री. डावखरे यांना धन्यवाद देण्यात आले आहेत