विविध कल्याणकारी, शासकीय योजनांच्या माहितीसाठी मंडणगड तहसीलने केले व्हाट्सअप चॅनल सुरु.

तहसिल कार्यालयाचा अनोखा उपक्रम 

मंडणगड | प्रतिनिधी – राज्यशासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्याच्या अंतर्गत दापोली महसूल उपविभागाने व्हाट्सअप चॅनल तयार केले असून या चॅनलच्या माध्यमातून आता नागरिकांना महसूल विभागाच्या विविध योजनांची, उपक्रमांची माहिती मिळणार आहे.

 

दापोली महसुल उपविभाग अंर्तगत हे व्हॉट्सअप चँनल तयार करण्यात आले आहे. यामध्ये तहसील कार्यालय मंडणगड, तहसील कार्यालय दापोली आणि उपविभागीय कार्यालय दापोली यांच्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, शासकीय योजना, विविध उपक्रम यांची माहीती या चँनलच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणार आहे. हे चॅनल फॉलो करून नागरिक ही सर्व माहिती घरबसल्या आपल्या व्हॉट्सअँप वर प्राप्त करू शकतात. तरी या उपक्रमांत नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मंडणगडचे तहसिलदार अक्षय ढाकणे यांनी केले आहे.
या क्यू आर कोडवर स्कॅन करून नागरिकांना चॅनल जॉईन करता येईल. अशी माहिती तहसील कार्यालयाने दिली आहे.