मौजे दापोली येथे 6 एप्रिल 2025 रोजी साई समर्थ मंदिराच्या 23 व्या प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन

दापोली l प्रतिनिधी-दापोली तालुक्यातील मौजे दापोली येथील श्री साई समर्थ मंदिराचा 23 वा प्रकट दिन रविवार दि. 6 एप्रिल 2025 रोजी साईनगर मौजे दापोली येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने नामस्मरण, काकडा आरती, पंचामृत पूजा, रथ यात्रा, भजन, किर्तन व सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

यावेळी शनिवार दि. 05 एप्रिल रोजी सकाळी 6.00 सनई चौघडा, स. 7.30 वा. पंचामृत पूजा, सायं. 4 ते 7 वा महिला व लहान मुलांसाठी फनीगेम, सायं. 7.30 ते 8 वा. आरती, रा. 8.00 वाजता विद्याभारती भजन मंडळ – सौ. संध्या रेवाळे यांचे भजन तर रविवार दि. 6 एप्रिल रोजी स. 5.30 ते 6 वा. काकडा आरती, स. 6 ते 6.30 सनई चौघडा, स. 10.30 ते 12.30 वा.श्रीम. प्राची पेंडसे खेड यांचे किर्तन, दु. 12.30 वा. श्री साईबाबांचा प्रकट दिन सोहळा, सायं. 4 ते 7 वा. साईनाथ रथ यात्रा, रा. 7 ते 8 वाजता महाआरती व तिर्थप्रसाद, रा. 8 ते 9 मान्यवरांचे सत्कार व मनोगत, रा. 9.30 वा. महाप्रसाद व रा. 10.30 वा. मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री ना. श्री. योगेश कदम, दापोलीच्या तहसिलदार अर्चना बोंबे घोलप, दापोली नगरपंचायतीचे नगरसेवक श्री. रविंद्र क्षिरसागर, आर.व्ही.बेलोसे एज्युकेशन फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीम. जानकी बेलोसे व पत्रकार श्री. जगदिश वामकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन साई सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. सुधिर कालेकर यांनी केले आहे.