विज्ञान रंजन स्पर्धेत तळवली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश

गुहागर l प्रतिनिधी :          *न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली, ता. गुहागर जि. रत्नागिरी येथील विद्यार्थ्यांनी रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ आयोजित विज्ञान रंजन स्पर्धा परीक्षेमध्ये सुयश प्राप्त केले.त्या सर्व विद्यार्थ्यांचा पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री.मंगेश जोशी साहेब व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.प्रदीप चव्हाण साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या सुयश प्राप्त विद्यार्थ्यांचे परिसरातून अभिनंदन केले जात आहे.*

          *रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळामार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विज्ञान रंजन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धा एकूण तीन गटांमध्ये घेण्यात आल्या त्यापैकी गट क्रमांक एक मध्ये कु.मंथन योगेश साळवी कुस्वराज अमोल शिरकर व शुभ्रा समीर शिंदे या विद्यार्थ्यांंनी विशेष गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला.तसेच गट क्रमांक दोन मध्ये कु.तनुश्री नोमेश कारेकर,कु.वेदांत वैभव शितप व कु.मिहीर प्रकाश वणे या विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली.तसेच गट क्रमांक तीन मध्ये कु.माही प्रकाश मयेकर, कु.पायल पंढरीनाथ धामणस्कर,कु.समीरा उमेश जोशी या विद्यार्थिनींनी प्रथम श्रेणी प्राप्त केली.*

*या स्पर्धा शाळा अंतर्गत घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेत सुयश प्राप्त विद्यार्थ्यांपैकी गट क्रमांक एक मधून कुमार मंथन योगेश साळवी या विद्यार्थ्याने तालुकास्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला तर जिल्हास्तरीय स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकावला त्याबद्दल त्याला ट्रॉफी,सन्मानपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.कु.मथन साळवी याने विशेष यश प्राप्त केल्या बद्दल श्री.मंगेश जोशी साहेब यांनी त्याला रोख रक्कम बक्षीस देऊन त्याचे विशेष कौतुक केले.सुयश प्राप्त सर्व विद्यार्थ्यांचा पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव श्री.मंगेश जोशी साहेब व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.प्रदीप चव्हाण साहेब तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.एम.ए.थरकार सर, प्रा अमोल जड्याळ सर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे विज्ञान शिक्षक श्री.ओंकार पुनस्कर सर व सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.श्रीनाथ कुळे सर यांनाही पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले,या कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री.देवरुखकर सर यांनी केले शेवटी त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.*