मनसे तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
गुहागर | प्रतिनिधी :
महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे गुहागर विधानसभा क्षेत्र यांच्या वतीने गुहागर तालुक्यात विविध कार्यक्रम संपन्न झाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जानवळे शाखा यांच्या वतीने मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या सौजन्याने पूर्ण प्राथमिक जिल्हा परिषद शाळा, जानवळे क्र.१ येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत दोन रौप्यपदक मिळवणाऱ्या साईम मालगुंडकर या विद्यार्थ्याचा विशेष सन्मान करून त्याला प्रोत्साहन देण्यात आले. यावेळी सामाजिक वनीकरण गुहागरचे वनरक्षक अमोल माळी,सामाजिक वनीकरण गुहागरचे वनपाल कृष्णा शिंदे मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद गणेश जानवळकर,मनसे गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, उपविभाग अध्यक्ष विश्वजीत पोद्दार, जानवळे ग्रामपंचायत उपसरपंच वैभवी विनोद जानवळकर, शाखा अध्यक्ष सुशांत कोळंबेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप कोंडविलकर, जाणवळे शाळा क्र.१ चे मुख्याध्यापक कैलास शार्दुल , सचिन कांबळे, महाराष्ट्र सैनिक विवेक जानवळकर निलेश गमरे, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष राहुल जाधव शिक्षक वृंद विद्यार्थी उपस्थित होते











