लांजा बागेश्री शाळेचीं ऋत्वी आगरे हीचे मंथन परीक्षेत घवघवीत यश 

लांजा (प्रतिनिधी ) जिल्हा परिषद मराठी शाळा लांजा बागेश्री शाळेची इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी कु.ऋत्वि अजय आगरे हिने मंथन परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले आहे.

ऋत्वी आगरे हिने या परीक्षेत राज्यात नववा व रत्नागिरी जिल्ह्यात चौथा क्रमांक पटकावला आहे.. यासाठी तिला तिचे पालक अजय आगरे, प्रांजल आगरे व वर्गशिक्षिका नंदिनी पेडणेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले..

याबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.सविता पाटील व केंद्रप्रमुख श्री पावसकर यांनी तिचे अभिनंदन केले आहे. आणि तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे