दोडामार्गमध्ये आज खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा

दोडामार्ग : प्रतिनिधी

 

दोडामार्ग तालुक्याचे शिल्पकार तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग तालुका भाजपच्या वतीने बुधवार ९ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वा. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जि. प. प्राथमिक शाळा दोडामार्ग यांच्या पटांगणात सदर स्पर्धा होणार आहे. स्पर्धा भारतीय जनता पार्टी दोडामार्ग यांच्यावतीने आयोजीत करण्यात आलेली आहे. तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कबड्डी प्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी केले आहे.

——