ओरोस:
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभाग (वेतन पथक), ओरोस येथील वरिष्ठ लिपिक श्री. विजय मुणगेकर यांच्या मातोश्रीं चंद्रभागा कृष्णा मुणगेकर यांचे रविवार, दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय वर्ष ९० च्या आसपास होते.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा आणि सुसंस्कृत परिवार आहे. मुणगेकर कुटुंबीयांवर कोसळलेल्या या दुःखामुळे ओरोस शिक्षण विभाग आणि मुणगे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्याचा अत्यंविधी कार्यक्रम सोमवार, दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता त्यांच्या मूळ गावी मुणगे येथे करण्यात येणार आहे.











