दोडामार्ग : कोलझर मधलीवाडी येथील रहिवासी जनार्दन विष्णू देसाई (वय ८४) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. ते गेले काही दिवस आजारी होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. सावंतवाडी संस्थान मराठा समाज संस्थेचे माजी कार्याध्यक्ष कै. टी. व्ही. देसाई यांचे ते बंधू होत. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक विवाहित मुलगी, सुना नातवंडे असा परीवार आहे.












