संगमेश्वर : सोनगिरी येथील वृद्ध महिलेने प्राशन केले उंदिर मारण्याचे विषारी औषध; रुग्णालयात दाखल

रत्नागिरी ः प्रतिनिधी
सोनगिरी (ता. संगमेश्वर) येथील वृद्ध महिलेने अज्ञात कारणातून उंदिर मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून तिची तब्बेत स्थिर आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोद करण्यात आली आहे.
अरुणा अशोक खातू ( ६६, रा. सोनगिरी, ता. संगमेश्वर) असे उंदिर मारण्याचे विषारी द्रव्य प्राशन करणाऱ्या वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी १५ एप्रिल रोजी सकाळी 9.30 व. सुमारास निदर्शनास आली. अरुणा हिने कोणत्यातरी अज्ञात कारणातून उंदिर मारण्याचे विषारी द्रव्य प्राशन केले. तिला अस्वस्थ वाटू लागले. ही बाब तिचा मुलगा अनिकेत खातू याच्या लक्षात येताच त्याने तातडीने तीला उपचारासाठी संगमेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले असून तिची तब्बेत स्थीर आहे.