चिंद्रवली कोनी येथील पर्‍यात पाय घसरुन पडल्याने आसाम येथील तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी | प्रतिनिधी : 
तालुक्यातील चिंद्रवली कोनी येथील पर्‍यात पाय घसरुन पडल्यामुळे आसाम येथील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार 14 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वा. सुमारास घडली.
धन दामर चेत्री (33,रा.लकला जि. तिनसुळिया,आसाम) असे पाय घसरुन पडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवारी सकाळी तो थिवीम ते हजरत निजामुद्दीन असा प्रवास करत असताना निवसर रेल्वेस्टेशनवर उतरला. त्यानंतर तो रेल्वेस्टेशनच्या विरुध्द बाजुला जाउन तेथून चिंद्रवली कोनी येथील पर्‍यातून चालत जात असताना त्याचा पाय घसरुन पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.