राजापूर (प्रतिनिधी): तालुक्यातील तळगाव वाकिरले येथे ४०,००० रुपये किमतीच्या ९ खैराच्या झाडांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सुधाकर महादेव लाड (वय ५५, रा. तळगाव वरचीवाडी, सध्या मुंबई) यांनी राजापूर पोलीसांत तक्रार दिली आहे. लाड यांच्या तक्रारीवरून राजापूर पोलीसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तशी माहिती पोलीसांनी दिली आहे.
आपल्या मालकीच्या व हिश्शाच्या जमिनीवर असलेल्या खैरांच्या झाडांची चोरी झाल्याचे लाड यांनी तक्रारीत नमुद केले आहे. १ फेब्रुवारी २०२५ ते ७ एप्रिल २०२५ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. घडली. लाड यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी राजापूर पोलीसांनी विलास धाकु सावंत (रा. तळगाव सावंतवाडी), भुषण विलास सावंत (रा. तळगाव सावंतवाडी), गंगाराम रघुनाथ सावंत (रा. तळगाव माळनाका), तेजस अजित पोटफोडे (रा. तळगाव तांबटवाडी), सर्वेश किशोर पोटफोडे (रा. तळगाव तांबटवाडी), उमाजी महादेव सौंदळकर (रा. तळगाव नवानगर), तुकाराम महादेव सौंदळकर (रा. तळगाव नवानगर) या सात जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादींची कोणतीही परवानगी न घेता, लबाडीच्या हेतूने आणि स्वतःच्या फायद्यासाठी सुमारे ४० हजार रूपये किमतीचे ९ खैराची झाडे खणून काढली आणि चोरून नेल्याचे पोलीसांनी नमुद करत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
——————————————————-












