रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरातील नाईक हायस्कुल ते राहूल कॉलनीकउे जाणार्या सार्वजनिक टॉयलेटच्या बाजुला गांजा हा अमली पदार्थ सेवन करणार्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार 19 एप्रिल रोजी सायंकाळी 7.45 वा. करण्यात आली.
तेजस प्रदिप देसाई (30,रा.रमेशनगर नाचणे,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल प्रविण विर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा शनिवारी सायंकाळी राहूल कॉलनी येथील सार्वजनिक टॉयलेटच्या बाजुला बेकायदेशिरपणे गांजा हा अमली पदार्थ सेवन करताना मिळून आला.










