रत्नागिरी तालुक्यात ४७ ग्रामपंचायतींवर महिला राज

रत्नागिरी | प्रतिनिधी :

महिलांना सत्तेत 50 टक्के सहभाग देणाऱ्या ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी जिल्ह्यात तालुकास्तरावर काढण्यात आली. अर्थातच या सोडतीमुळे अनेकांचे सरपंच होण्याचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील ९४ ग्राम पंचायतींपैकी ४७ ठिकाणी महिला राज असेल हे अपेक्षित होते. त्यात अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 2, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 13 तर सर्वसाधारण गटात 32 जागांवर महिला आरक्षण पडले असून त्यात महत्वच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

रत्नागिरीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी तालुक्यातील २०२५ ते २०३० या कालावधीसाठी सरपंचपदाचे आरक्षण सोडत जाहीर केली. त्यामध्ये
तालुक्यातील कशेळी व हरचिरी या दोन गावांना अनुसुचित जाती स्त्री चे आरक्षण; धामणसे, वाटद, कुरतडे अनुसूचित जातीचे आरक्षण जाहीर झाले आहे.

तर नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी गावडेआंबेरे, पाली, खरवते, रिळ, कापडगाव, हातखंबा, पोमेंडी खुर्द, साखरमोहल्ला, मिर्‍या, कोळंबे, जयगड, फणसवळे, पिरंदवणे या ग्रामपंचायतींची सरपंच पदे आरक्षित झाली तर नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी मेर्वी, कळझोंडी, निवळी, उक्षी, पावस, चाफे, भाट्ये, चरवेली, नाखरे, आगरनरळ, मावळंगे, शिरगांव, पानवल या गावांची सरपंचपदे आरक्षित झाली आहेत.

सर्वसाधारण स्त्रीवर्गासाठी आरक्षित झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये काळबादेवी, देवूड, चांदेराई, तरवळ, शिवारआंबेरे, विल्ये, नाचणे, नाणीज, बोंड्ये, टेंभ्ये, टिके, सत्कोंडी, वळके, वेतोशी, वरवडे, गावखडी, खेडशी, मिरजोळे, खानू, कोतवडे, गडनरळ, मजगांव, लाजूळ, दांडेआडोम, सैतवडे, नेवरे, डोर्ले, खालगांव, जांभरुण, जांभारी, चवे, नांदीवडे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे आणि सर्वसाधारण जागेसाठी चाफेरी, गोळप, पोमेंडी बु., कर्ला, सडामिर्‍या, राई, गणपतीपुळे, गुंबद, चांदोर, निवेंडी, करबुडे, निरुळ, बसणी, साठरे, मालगुंड, कुवारबांव, वेळवंड, कासारवेली, तोणदे, सोमेश्‍वर, केळ्ये, गणेशगुळे, पूर्णगड, कासारी, फणसोप, चिंद्रवली, झरेवाडी, रानपाट, भगवतीनगर, ओरी व भोके या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.