रत्नागिरी: शहरानजीकच्या कारवाची वाडी येथे पोदार प्रेप ह्या शाळेमध्ये पालकांसाठी किडुकेशन ट्रेन ह्या थिम अंतर्गत पालकांसाठी ओरिएंटशन आयोजित करण्यात आले होते.शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरु होण्यापूर्वी पालकांसाठी आयोजित केलेल्या ह्या सभेमध्ये मोठ्या संख्येने पालकवर्ग मुलांसोबत उपस्थित होता.
सर्व शिक्षकांनी ह्या सभेमध्ये पालकांना विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच ह्यावर्षी मुलांसाठी नव्याने येऊ घातलेल्या टूडनेमी ह्या अँप्लिकेशन विषयी माहिती देण्यात आली.
तसेच अभ्यासक्रमाव्यतिरिक्त शाळेमध्ये उपलब्ध असलेल्या ऍकशन मॅट, इमरसिव स्पा, कोडींग इत्यादी विषयी माहिती देण्यात आली.
पालकवर्ग अतिशय आनंदाने आणि उत्साहाने ह्या उपक्रमात सहभागी झाला होता.
उपक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षकवर्गाने खूप मेहनत घेतली.
पोदार प्रेप च्या प्रेसिडेंट डॉ. स्वाती पोपट वत्स ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पालक ओरिएंटशन उपक्रम तयार करण्यात आला.
पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका सौ. अस्मिता चोप्रा आणि पोदार इंटरनॅशनल स्कूल च्या प्राचार्या सौ. प्राजक्ती गायकवाड मॅडम ह्यांचे मार्गदर्शन पालकांना लाभले.











