वेंगुर्ले : प्रतिनिधी
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या पत्नी सौ प्रतिभा पवार यांनी आरवली येथील प्रसिद्ध श्री. वेतोबा देवाचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थानच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.शरद पवार यांच्यासोबत सिंधुदुर्ग दौऱ्यावर त्या आल्या होत्या. वेतोबा देवाचे दर्शन घेतल्यानंतर देवस्थान च्या कार्यालयात त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष जयवंत राय, आबा टाककर, डॉ. प्रसाद साळगावकर, आरवली चे माजी सरपंच विलास चिपकर, मयुर आरोलकर, पोलिस पाटील मधुसूदन मेस्त्री व अन्य उपस्थित होते












