खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील सुसेरी नं. १ येथील शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने शिवजयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत सुसेरी साठेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत मोफत नेत्र तपासणी शिबीर घेण्यात येणार आहेत, शिबिरात रुग्णांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.











