वार्ताहर l पाली : पाली-पाथरट गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मी पल्लीनाथ व श्री करंबेळदेव मंदिराच्या जीर्णोध्दाराचा व कलशारोहण सोहळ्याच्या १६ वा वर्धापनदिन कार्यक्रम उद्यापासून दि.३० एप्रिल व १ मे रोजी पाली येथील मुख्य मंदिरात पार पडणार आहेत. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दि.३० एप्रिल रोजी श्री लक्ष्मी पल्लीनाथ मंदिरात स.९ ते १२ वा. पर्यंत श्रींवर लघुरूद्र अभिषेक, दु.१२ ते १२.३० वा. नैवेद्य, आरती, १२.३० ते १.३० वा.पर्यंत मंदिरासभोवती ढोलताशांच्या गजरात भोवत्या व १.३० ते ३ वा.पर्यंत महाप्रसाद व रात्री ९ ते १०.३० स्थानिक भजन असा कार्यक्रम होणार आहे.गुरुवार,दि.१ मे रोजी श्री करंबेळदेव मंदिरात स.९ ते दुपारी १२ वा. पर्यंत श्रींवर लघुरूद्र अभिषेक,दु.१२ ते १२.३० वा. नैवेद्य, आरती, १२.३० ते १.३० वा. मंदिराभोवती ढोलताशांच्या गजरात प्रदक्षिणा, १.३० ते ३ वा. पर्यंत महाप्रसाद व रात्री ८.३० वा. सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानचे मुख्य मानकरी व अध्यक्ष संतोष नारायण सावंतदेसाई यांनी केले आहे.









