माखजन | वार्ताहर : नुकतेच दहावी बारावीचे रिझल्ट लागले असून रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकली आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केले असूनही त्यांना या जिल्ह्यात नोकऱ्या मिळवण्यात हे येथील दोन मंत्री व आमदारांचे अपयश आहे असे मत सुरेश भायजे यांनी व्यक्त केले.
ते कुणबी समाज संघ , संगमेश्वर ग्राम शाखा आंबवपोंक्षे च्या वतीने सरंद येथे आयोजित केलेल्या विद्यार्थी गुणगौरव समारंभात बोलताना व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, पवित्र पोर्टल मधून जी १४४६ शिक्षक भरती झाली. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील फक्त १४ मुलांनाच नोकऱ्या मिळाल्या. ९९ टक्के शिक्षक भरती ही पर जिल्ह्यातील झाले असून त्याबाबत स्थानिकांचा फार असंतोष निर्माण झाला होता. सर्व लोकप्रतिनिधींना याबाबत चौकशी होऊन भ्रष्टाचार उघड करण्यात बाबतची निवेदन देण्यात आली होती मात्र एकाही लोकप्रतिनिधीने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात, उन्हाळी अधिवेशनात, विधिमंडळात हा प्रश्न हा प्रश्न मांडलेला नाही. जिल्ह्यातील गुणवंत मुलांना त्या त्या क्षेत्रात स्थानिक ठिकाणी मग तो गृह शिक्षक असो ग्रामसेवक असो तलाठी असो व आरोग्य कर्मचारी असो त्यांना नोकरी मिळणे हा त्यांचा न्याय हक्क आहे तो त्यांना मिळाला पाहिजे. मात्र तो राजकीय भ्रष्टाचारातून हिसकावून घेतला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी दोन मंत्री व आमदार हे स्थानिकांच्या काहीच उपयोगाचे नसल्याने त्यांना टेम्पोत घाला असे उपहार उपहासात्मक आवाहन बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष व या कार्यक्रमाचे उद्घाटक सुरेश भायजे यांनी केले.
यावेळी बोलताना बळीराज सेनेचे तालुकाध्यक्ष श्री.नितीन लोकम म्हणाले की, मी चांगल्या मार्कांनी डीएड परीक्षा उत्तीर्ण झालो मात्र त्याचवेळी रत्नागिरी जिल्ह्यात केंद्रीय शिक्षक भरती पद्धत लागू झाली होती. पूर्वी स्थानिक ८०% व परत जिल्ह्यातील २० टक्के अशी शिक्षक भरती होतांच प्रमाण होतं. त्यामुळे ८० टक्के स्थानिक मुलांना नोकऱ्या मिळत होत्या. केंद्रीय पद्धत लागल्यामुळे जिल्हा बाहेरचीच मुलं रत्नागिरी जिल्ह्यात नोकऱ्या वर दावेदार झाली. आम्ही स्थानिक मात्र उदरनिर्वाहासाठी शिक्षक होण्यास पात्र असतानाही शिक्षकाची नोकरी न मिळाल्याने माझ्याबरोबरच्या अनेकांना हलकी मोलमजुरी कष्टाची काम करावी लागली .माझ्याबरोबरचे काही मित्र मंडप मध्ये तर काहींनी हातात ब्रश घेऊन रंगकाम करण्याची,जंगलतोड कामगार म्हणून कष्टाची काम पत्करली. हे बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले.
यावेळी बोलताना माजी सभापती नारायण भुरवणे म्हणाले की दहावी बारावी पर्यंत स्थानिक मुलं चमकतात मात्र पुढे त्यांचं काय होतं याचा वेध कोणीच घेत नाहीत. बुद्धिमत्ता असूनही अनेक मुलं दारिद्र्यच कितपत पडलेली पाहायला मिळतात अशी भयावह परिस्थिती आज निर्माण झालेली आहे.
यावेळी तालुका कुणबी संघ अध्यक्ष शरदचंद्र गीते, मुंबई अध्यक्ष संजय गोंधळी, उद्योजक प्रभाकर धनावडे, माजी सभापती सौ नम्रता कवळकर, श्री. संतोष डावल, श्री. कृष्णा धुळप,श्री.सचिन पाटोळे, सौ.स्नेहल कातळकर यांनी विचार मांडले.
यावेळी धामापूर भडवळेवाडी गावचे सुपुत्र श्री. रोहन शिगवण याने एमपीएससी मध्ये अठराव्या रँक ने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवल्याने व ९९% मार्क घेऊन संगमेश्वर तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली माखजन हायस्कूलची कु. आर्या पडये , प्रज्ञाशोध परीक्षेत महाराष्ट्र चौथी आलेली कु. नाचरे यांचा विशेष सत्कार सन्मानपत्र, शाल ,श्रीफळ व भेटवस्तू देऊन सुरेश भायजे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
यावेळी दहावी व बारावी परीक्षेत ८०% टक्के हून अधिक मार्क मिळवणाऱ्या मुला मुलींचा सत्कार यावेळी करण्यात आला.
यावेळी मागणी विभागातील वयोवृद्ध समाजसेवकांचा सन्मान चिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला त्यामध्ये बुरुंबाड चे माजी जि प सदस्य शंकर गणेश कवळकर, काशे गावचे उद्योजक श्री.अर्जुनशेठ गोताड, धामापूरचे माजी सरपंच व गावकर श्री.सोनू भायजे. कोंडीवरे गावचे माजी सरपंच श्री. कृष्णा भुवड,आरवली गावचे कृष्णा लांबे,भोसले गावकर,माखजन गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक उर्फ बंधू तांबे,करजुवे गावचे माजी सरपंच श्री. दत्ताराम गेल्ये, माजी केंद्रप्रमुख शांताराम जड्यार आदी वयोवृद्धांचा त्यांच्या उत्कृष्ट सामाजिक कामगिरी बाबत मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या यावेळी दत्ताराम लांबे अध्यक्ष कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ संगमेश्वर, प्रकाश वीर सरपंच मावळंगे, सो भुवड सरपंच कोंडीवरे, राजेंद्र मेणे पोलीस पाटील मुरडव, सुनील भुवड, विलास मांडवकर, सुरेश बाळू जुवळे, ह भ प गणपत गोटेकर, शंकर सुवरे, गणपत घडशी, दत्ताराम हेमंन, दत्ताराम घडशी गणपत बोले आदी उपस्थित होते कार्यक्रमातील सूत्रसंचालन सचिव श्री दीपक शिगवण यांनी केले.












