मंडणगड मध्ये पोलिसांच्या वतीने मॉक ड्रील

मंडणगड l प्रतिनिधी – मंडणगड शहरात अचानक बुधवारी सायंकाळी ( दि.8मे ) सायरन वाजला आणि नागरिकांची धावपळ उडाली. सर्व ग्रामस्थांना मंडणगड पोलिसांमार्फत अलर्ट करण्यात आलं. सद्याच्या युद्धजन्य स्थितीत शत्रूकडून कोणतीही कारवाई झाली, तशी परिस्थिती निर्माण झाल्यावर नागरिकांनी व यंत्रणेने काय करायचे? या संदर्भात मॉक ड्रील करण्यात आले.

मॉकड्रिलसाठी ठरलेल्या वेळेनुसार सायरन वाजवला आणि लोकांना परिस्थिती विषयी सूचना दिल्या गेल्या. पोलीस आणि होमगार्डची टीम यांनी मॉक ड्रील मध्ये सहभाग नोंदविला. यावेळी पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांनी अशा युध्दजन्य परिस्थितीच्या वेळी नागरिकांनी काय करायला पाहिजे? याच्या सूचना उपस्थित नागरिकांना समजावून सांगितल्या.