सावंतवाडी बस स्थानकातील खळबळ जनक घटना
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी बस स्थानकात एसटी बस आत घेत असताना तेथे असलेली भिंत व एसटी बस यांच्यामध्ये सापडून १९ वर्षीय युवक जखमी झाला. उवेद अन्सारी ( रा. सावंतवाडी ) असे त्याचे नाव आहे. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घटना घडली. त्याला त्वरित उपचारार्थ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर अधिक उपचारांसाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले. मनसेचे पदाधिकारी केतन सावंत व अनिकेत दळवी यांनी त्याला प्रथमोपचारासाठी नेण्यासाठी मदत केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तो घाबरला होता. गंभीर दुखापत झाली नसली तरीही मुका मार लागलेला असल्याने त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
याबाबतची अधिक माहिती अशी की, जखमी उवेद अन्सारी हा परप्रांतीय युवक असून तो आपल्या कुटुंबीयांसमवेत कोलगाव येथे राहतो. सावंतवाडी शहरात तो नोकरी करायचा. गुरुवारी कामावरून सुटल्यानंतर कोलगाव येथे घरी जाण्यासाठी तो एसटी स्थानकात आला होता. याचवेळी फलाटाच्या दिशेने जात असलेल्या एसटीच्या व कंट्रोल केबिनच्या बाजूला असलेल्या भिंतीच्या मध्ये तो चिरडला गेला. ही बाब लक्षात येताच तेथे असलेल्या प्रवाशांनी आरडा ओरड केल्यानंतर गाडी जाग्यावरच थांबविण्यात आली. त्यानंतर तेथील प्रवासी एसटीचे अधिकारी व कर्मचारी यांनी त्याला बाजूला केले.
मात्र, जखमी अवस्थेत असलेल्या उवेद याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची तसदी कोणीही घेतली नाही. याचवेळी तेथील एका बुक डेपो मालकाने मनसेचा पदाधिकारी असलेल्या केतन सावंत याला फोनवरून याबाबतची माहिती दिली. आपल्या दुकानात असलेल्या केतन याने क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रुग्णवाहिकेची वाट न बघता तेथे बाजूलाच असलेल्या रिक्षात जखमीला घालून उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.
साठी त्याला एसटीचे कर्मचारी कुबल तसेच त्याचा मित्र व मनसेचा पदाधिकारी अनिकेत दळवी याच्यासह स्थानिक प्रवाशांनी मदत केली. उपजिल्हा रुग्णालयात जखमी उवेद अन्सारी त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्याला गंभीर दुखापत दिसत नसली तरी मोठ्या प्रमाणात मुका मार लागल्याने अधिक उपचारासाठी त्याला गोवा बांबुळी रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी त्याचा भाऊ व अन्य नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले होते.
मनसे पदाधिकारी केतन सावंत व अनिकेत दळवी यांनी दाखविलेल्या प्रसंगावधान व माणुसकी बाबत त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.