राजापुरातील खिदीर ब्रदर्सच मालक सत्तार खिदीर यांचे निधन

राजापूर l प्रतिनिधी : शहरातील खिदीर ब्रदर्सचे मालक ,काजू व्यावसायिक व राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे माजी संचालक सत्तार अलिसाहेब खिदीर (७५) यांचे शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.

मुळचे खिणगिणी गावचे रहिवाशी असलेले सत्तार खिदीर हे व्यवसायासाठी राजापुरात आले व राजापूर शहरात मापारी वाडा येथे स्थायिक झाले. शहरात खिदीर ब्रदर्स या नावाने त्यांनी काजू व्यवसायाला सुरूवात केली. आज त्यांचा हा व्यवसाय त्यांची मुले सांभाळत आहेत. तर कौल विक्रीचाही व्यवसाय त्यांनी केला. राजापुर तालुका एज्युकेशन सोसायटीवर संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. एक शांत, सयंमी व मितभाषी व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख होती. व्यवसायासाठी राजापूर शहरात आले तरी त्यांचा आपल्या मुळ खिणगिणी गावातही कायमच संपर्क होता. अत्यंत प्रामाणिकपणे व सचोटीने व्यवसाय करत त्यांनी आपला व्यवसाय नावारूपाला आणला.

गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. शनिवारी सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले व त्यातच त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर रविवारी सकाळी ९ वाजता दफन विधी होणार आहेत.