चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील खडपोली येथील नदीमध्ये काही दिवसांपूर्वी मासे पकडण्यासाठी गेलेल्या आणि अचानक पाणी वाढल्यामुळे पाण्यात अडकलेल्या चारजणांना स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचविणाऱ्या चिपळूण नगरपरिषदेतील अग्नीशमन दलातील कर्मचारी व अधिकारी यांचा सत्कार भारतीय जनता पार्टी चिपळूण शहर मंडलतर्फे करण्यात आला.
नगरपरिषदचे अग्निशमन दलाचे कर्मचारी अग्निशमन अधिकारी आनंद बामणे, अग्निशामक अमोल वीर, भूषण भोजने, प्रतीक घेवडेकर, शुभम चिवेलकर, वाहनचालक अभय गांधी यांचा सत्कार भाजप चिपळूण शहर मंडल यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी चिपळूण शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, सारिका भावे, प्रणाली सावर्डेकर, अभय चितळे, मधुकर निमकर, संदेश ओक, श्री. राजापूरकर, निनाद आवटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. ही बचाव मोहीम सुरु असताना सर्व प्रशासकीय यंत्रणा नदी किनारी लक्ष ठेऊन होती. प्रशासनाच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी झाली. त्या वेळी प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालयीन अधिक्षक रोहित खाडे, आरोग्य निरीक्षक सुजीत जाधव, अभिलेख भांडार विभाग प्रमुख वलीद वांगडे, रवि सातपुते आदी उपस्थित होते.










