Ratnagiri: पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत साजला श्री देव भैरी बुवांचा गाभारा

Shri Dev Bhairi Buvancha Gabhara appeared giving the message of environmental protection

रत्नागिरी | प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिनादिवशी रत्नागिरीतील बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरीचा गाभारा विविध रोपे, झाडांच्या फांदयानी सुशोभीत झाला होता. यातूनच ग्रामदेवतेनेच भक्तांना वाढत्या उन्हाळ्यात वृक्ष लागवड आणि पर्यावरण संवर्धनाचा जणू संदेशच यातून दिला आहे.

रत्नागिरीतील निसर्ग प्रेमी व भैरी भक्त यांच्या संकल्पनेतून आणि मंदिराचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रत्नागिरीचे ग्रामदैवत भैरीबावाचा गाभारा हा विविध फुलझाडांची सजविला गेला होता. गुलाबापासून, शमी, बेल, जाई, जुई जास्वाद, अशा अनेक फुलझाडे, झाडांची रोपे श्री भैरी देवाच्या गाभाऱ्यात, अन्य देवातांच्या गाभाऱ्यात लावण्यात आली होती. मंदिराचे सभागृह सुद्धा मनमोहक फुलझाडानी सजविण्यात आले होते. त्यामुळे आज देवाचे एक आगळे रूप दिसतं होते. पावसाळ्यात ही रोपे मंदिर परिसरात लावण्यात येणार आहेत तसेच त्यांचे संगोपन केले जाईल.समीर गुरव आणि मित्रमंडळाच्या माध्यमातूम हा उपक्रम राबविण्यात आला.