एकवीसव्या शतकातील आदर्शवत असे मालवण शहर बनवणार : आमदार निलेश राणे

मालवण नगरपरिषद अग्निशमन केंद्र इमारतीचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते उदघाटन

अमित खोत | मालवण : मालवण शहारात सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून देताना एकवीसव्या शतकातील आदर्शवत असे मालवण शहर बनवले जाईल. विकास प्रकल्पांसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून दिला जाईल. शहरवासीय नागरिक तसेच पर्यटकांच्या दृष्टीने आवश्यक सुविधा निर्माण केल्या जातील. असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी मालवण नगरपरिषद येथे बोलताना केले.

मालवण नगरपरिषद अग्निशमन केंद्र व कर्मचारी निवासस्थान इमारत उ‌द्घाटन सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, तहसीलदार वर्षा झालटे, मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, माजी जिप अध्यक्ष संजय पडते, मालवण कुडाळ मतदार संघ प्रमुख बबन शिंदे, तालुका प्रमुख राजा गावकर, आबा हडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, पंकज सादये, गणेश कुशे, पूजा करलकर, आप्पा लुडबे, शिवसेना माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, शहरप्रमुख बाळू नाटेकर, ललित चव्हाण, भाई मांजरेकर, संदीप भोजने नानाशेठ पारकर, मोहन शिरसाट, राजन सरमळकर, राजू बिडये, अंजना सामंत, अभय कदम, परशुराम पाटकर, सोनाली पाटकर, मोहन वराडकर, तारका चव्हाण, मधुरा तुळसकर, अरुण तोडणकर, मंदार लुडबे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते व अधिकारी सोनाली हळदणकर, सुधाकर पाटकर, महेश परब व अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राज्यभर साजरा होत असलेल्या पर्यावरण दिन निमित्ताने नगरपरिषद परिसरात आमदार निलेश राणे व जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षरोपण करण्यात आले. त्यांनंतर अग्निशमन केंद्र इमारतीचे लोकार्पण करून पाहाणी करण्यात आली. जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

अग्निशमन सेवाबळकटी अंतर्गत इमारतीची उभारणी

जिल्हा वार्षिक योजना अग्निशमन सेवाबळकटी अंतर्गत सुमारे दोन कोटी मंजूर निधीतून मालवण नगरपरिषद अग्निशमन केंद्र व कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकाम करणे फेज 1 (विंग ए) या इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. तळमजल्यावर सुसज्ज अग्निशमन वाहन पार्किंग सुविधा, तळमजला उर्वरित भाग अग्नीशमन केंद्र कार्यालय, स्टोअर रूम आणि नियंत्रण कक्ष, पहिला मजला वेटिंग रूम, रेस्ट रूम आणि ऑफिस. तर दुसरा मजला दोन प्रशस्त टू बीएचके रूम (अधिकारी निवासस्थान) असे इमारतीचे स्वरूप आहे.

आमदार निलेश राणे यांच्याचमुळे विकास कामे प्रगतीपथावर- मुख्याधिकारी

मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी मालवण शहरात गेल्या साडेचार वर्षात करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती दिली. तसेच आमदार नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सहा महिन्यात विकासकामे गतिमान झाली. मोठया प्रमाणात निधी उपलब्ध झाला. नवी नळपाणी योजना व अनेक कामे प्रगतीपथावर आहेत, स्पोर्ट कॉम्प्लेक्स आणि माजी मार्केट या कामांनाही चालना मिळालेली असून लवकरच सदरची काम मार्गी लागतील. असेही मुख्याधिकारी संतोष जिरगे यावेळी म्हणाले.

मालवण शहरातील वाहतूक प्रश्नावर विशेष लक्ष

मालवण शहरातील वाहतूक कोंडी समस्या सुटण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. वाहतूक व्यवस्था व अन्य उपाययोजना यासाठी जिल्हाधिकारी, आरटीओ यांच्या उपस्थितीत बैठक लवकरच आयोजित केली जाईल. मालवण शहर विकासाच्या दृष्टीने जेजे आवश्यक आहे. ते सर्व केले जाईल. येथे लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात. हे जागतिक शहर बनत आहे. त्या दृष्टीने सर्व आवश्यक सेवा सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नाशील असल्याचे आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केले.

मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे विशेष कौतुक

आमदार निलेश राणे यांनी मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्या कामाचे विशेष कौतुक केले. अनेक विकास प्रकल्प पुर्ण होत असताना गती घेत असताना त्यांचे योगदान महत्वाचे राहिले. त्यांच्या सोबत काम करण्यात एक वेगळी मजा येत असताना त्यांची बदली उपयुक्त पदी बढती होऊन होत आहे. त्यांना बढती मिळाली याचा आनंद आहे. मात्र मालवण शहाराच्या गतिमान विकासाच्या दृष्टीने त्यांच्यासोबत अजून काम करायचे होते. अश्या शब्दात आमदार निलेश राणे यांनी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे कौतुक केले.