सोशल मीडियावरून महिलेला गंडवले वर्क फ्रम वर्कच्या नावाखाली लाखांची फसवणूक

रत्नागिरी ः प्रतिनिधी

सोशल मिडियावर वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली महिलेची तब्बल 10 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना 8 मे 2025 रोजी सकाळी 8.30 ते 27 मे 2025 रोजी सायंकाळी 4 वा. कालावधीत कुवारबाव परिसरात घडली आहे.

प्रविण (पूर्ण नाव माहित नाही) आणि प्रविण (पूर्ण नाव माहित नाही) या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात रोहिणी मंदार गीते (45,रा.साईगण वृंदावन सोसायटी कुवारबाव,रत्नागिरी) यांनी शुक्रवार 6 जून रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयितांनी इन्स्टाग्राम या सोशल मिडीया अ‍ॅपवर जाहिरात ठेवून वर्क फ्रॉम होमची जाहिरात ठेवली होती. या जाहिरातीच्या नावाखाली स्केचर्स कंपनीमध्ये कामासाठी फिर्यादला टेलिग्राम अकाउंटवर माहिती देवून सुरुवातीला फिर्यादीला कस्टम ऑर्डरसाठी भरलेल्या रकमेवर त्यांना योग्य परतावा देउन त्यांचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर फिर्यादीने आपल्या बँक खात्यातून 10 लाख रुपये भरले होते. परंतू या रकमेचा कोणताही परतावा फिर्यादीला न देता त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम देखील परत न करता त्यांची फसवणूक केली.