खेड भरणे मार्ग खड्डेप्रश्नी बांधकाम खात्याला खेड भाजपचे निवेदन

खेड (प्रतिनिधी)खेड-भरणे मार्गावर खड्डे पडले असून वाहनचालकांची कसरत सुरू आहे. खड्ड्यांमुळे पादचाऱ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाच्या साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांची फसगतही होत आहे. तालुका भाजपच्या वतीने मार्गावरील खड्डे बुजवून सुस्थितीत आणण्यासाठी येथील सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन दिले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

याप्रसंगी तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, उपाध्यक्ष उदय बोरकर, जिल्हा सरचिटणीस भूषण काणे, तालुका सरचिटणीस अजय तोडकरी, सुहास सोहनी, वैजेश सागवेकर, विशाल होळकर, दिव्या होळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.