Ratnagiri: रत्नागिरीची बॉडी बिल्डींग अँड फिजिक स्पोर्ट्स असोसिएशन झाली महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशनसोबत संलग्न

Ratnagiri Bodybuilding and Physique Sports Association Jhali attached with Maharashtra Bodybuilding Association

रत्नागिरी : रत्नागिरीतील बॉडी बिल्डर हे वजनी गटातील स्पर्धा खेळून आपले करिअर घडवू शकतात या उद्देशाने रत्नागिरी जिल्हा जिम व्यावसायिक संघटनेतील सगळ्या तालुक्यातील पदाधिकारी यांनी मिळून बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स असोसिएशन स्थापन केली.

संस्थेची पहिली सर्वसाधारण सभा चिपळूण येथे संपन्न झाली. या सभेत महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असोसिएशनचे सेक्रेटरी राजेश चव्हाण अणि इतर पदाधिकारी मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. राजेश चव्हाण यांनी संघटनेशी संलग्न करून प्रमाणपत्र प्रदान करत उत्तम मार्गदर्शन करत आंतरराष्ट्रीय खेळाडू या रत्नागिरीतून घडतील अशी ग्वाही देऊन रत्नागिरी संघटनेला शुभेछा दिल्या. त्याबद्दल रत्नागिरी संघटनेचे अध्यक्ष संदीप(बावा) नाचणकर अणि सेक्रेटरी वैभव कांबळे अणि सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

संघटनेचे उपाध्यक्ष इरफान कादरी यांनी राजेश चव्हाण यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. अध्यक्ष संदीप नाचणकर यांनी मनोगत व्यक्त करत पालकमंत्री उदय सामंत अणि किरण सामंत यांनी संघटना स्थापनेसाठी केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले. पुढिल काळात मोठय़ा स्वरूपाच्या स्पर्धा रत्नागिरी सारख्या ठिकाणी यशस्वी रित्या घेऊ अशी ग्वाही दिली.