प्रतिनिधी/ रोहन कांबळे
ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस ‘वटपौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. वडाला प्रदक्षिणा घालून सूत गुंडाळून मनोभावे वटवृक्षाचे पूजन करून आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून प्रार्थना करताना सुवासिनी दिसत होत्या. दिवसभर उपवास करून हे व्रत महिलांनी केले. एकमेकींना वाण देण्यात आले.
सर्वत्र आज वटपौर्णिमेचा सण उत्साहात,आनंदात साजरा झाला. सुहासिनींनी वडाच्या झाडाला दोरा बांधून सात फेरे घेतले व आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्राार्थना केली. वडाच्या झाडाचे पूजन करण्यासाठी सायंकाळपर्यंत महिलांची गर्दी होती. काही महिलांनी कुंडीतील वडाच्या झाडाचे पूजन करून हा सण साजरा केला. एकत्र आलेल्या महिलांनी झीम्याचा फेर धरला. सुरेल आवाजातील पारंपरिक गाणी म्हणतं सण साजरा केला.













