रत्नागिरी l प्रतिनिधी :बेदरकारपणे डंपर चालवून रस्ता ओलांडणार्या वासराला गाडीची ठोकर देउन दुखापत केली. याप्रकरणी अज्ञात डंपर चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार 10 जून रोजी सकाळी 10 वा. सुमारास हातखंबा ते रत्नागिरी जाणार्या रस्त्यावर घडली.
याबाबत पोलिस हवालदार उदय बांदल (39) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी सकाळी ते डायल 112 वाहनातून ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. तेव्हा सकाळी 10 वा. सुमारास त्यांना एका अज्ञात डंपरने हातखंबा ते रत्नागिरी जात असताना रस्ता ओलांडणार्या वासराला ठोकर देउन अपघात केल्याचे निदर्शनास आले. यात वासराच्या उजव्या पायाच्या खुराजवळ दुखापत झाली. या अपघातानंतर डंपर चालकाने न थांबता तिथून पळ काढला. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.












